मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू , एक गंभीर जखमी

0
3

खेड –  मुंबई – गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

      ही घटना दुपारच्या सुमारास घडली. मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघालेली मारुती स्विफ्ट कार कशेडी बोगद्याजवळ पोहोचली असता अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की, कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला असून इंजिन फुटले आहे.

       या अपघातात वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. उर्वरित जखमी व्यक्तीला तात्काळ खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.