वाळूज:एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून चार मोटारसायकली जप्त केल्या असून, एकूण दोन लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ओअॅसीस चौकात सापळा रचून आरोपी विष्णू ज्ञानेश्वर सोनवणे (रा. गणेश हाउसिंग सोसायटी वडगाव कोल्हाटी) व शुभम शांताराम जाधव (रा. झेंडा चौक कुंभारवाडा, वाळूज) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली देऊन चार मोटारसायकली हस्तगत करून दिल्या.
या कारवाईत वाळूज पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले.
सदरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस उपायुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसउपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, पोलीस हवालदार विलास वाघ, जालींदर रंधे, सुरेश कचे, सुरेश भिसे, पोलीस अंमलदार . नितीन इनामे, समाधान पाटील, शिवनारायण नागरे, किशोर साबळे, बाळासाहेब देवबोणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

