सिंधुदुर्ग- सात वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी विष्णू प्रसाद डील्ली कृष्ण न्यौपाने (वय 61, मूळ नेपाळ) याला जिल्हा न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावास व विविध कलमांन्वये 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
वेंगुर्ले तालुक्यातील एका किनारपट्टी गावात आंबा बागेत काम करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबांतील अल्पवयीन बालिका आरोपीच्या मोबाईलवर कार्टून पाहण्यासाठी म्हणून गेली असता तिला शेजारील बागेत नेऊन तिला अनैसर्गिक कृत्य करण्यास सांगत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. व 10 रु चे आमिष देत याविषयी कुणाकडे वाच्यता न करण्याची धमकी ही दिली होती.
5 मार्च 2025 रोजी ही घटना घडली होती याबाबत दाखल दोषारोपपत्रा नुसार जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जलदगतीने खटल्याची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडित बालिका, पंच, वैद्यकीय अधिकारी, पीडितेची आई, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासी अधिकारी म्हणून निवती पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी काम पाहिले.
भारतीय न्याय संहिता 2023 कलम 65 (2) नुसार 20 वर्ष कारावास, 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद. बी एन एस 351 (2) नुसार 6 महिने साधी कैद. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, 2012 कलम 4 नुसार 20 वर्षे कारावास. 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद. पॉक्सो कलम 6 नुसार 20 वर्षे सश्रम कारावास 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद. पोक्सो कलम 8 नुसार 6 महिने साधी कैद 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस साधी कैद. पोक्सो कलम 12 नुसार 6 महिने साधी कैद. 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 7 दिवस कारावास

