सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीची सरशी; भाजप मोठा पक्ष, ठाकरे सेना चौथ्या स्थानी तर अपक्षांची बाजी!

0
34

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत तीनही राणेंचा करिष्मा पहायला मिळाला. एकूण ५० जागांपैकी महायुतीने ४० जागा काबीज केल्या आहेत. २७ जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाला १३ जागांवर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. एकूण ७ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत, त्यापैकी एक शिवसेना शिंदे गट पुरस्कृत आहे.

५० सदस्यांच्या या जिल्हा परिषदेत एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे ७ तर शिवसेना (शिंदे गट) यांचा १ उमेदवार आहे. भाजपा खासदार नारायण राणे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

वॉर्ड क्र. विजयी उमेदवार पक्ष
१ वैभववाडी कोळपे-प्रमोद रावराणे BJP 
कोकिसरे- श्रावणी रावराणे BJP
लोरे- रिद्धी सुतार  BJP
४ कणकवली खारेपाटण-प्राची इस्वालकर BJP 
कासार्डे-संतोष पारकर  BJP
जाणवली-रुहिता राजेश तांबे शिवसेना (शिंदे)
फोंडा-राजन चिके  अपक्ष 
हरकुळ बु.- मनोज रावराणे BJP
कलमठ- सुप्रिया मेस्त्री  BJP
१० कळसुली-शीतल दळवी  BJP
११ नाटळ- संदेश सावंत  BJP
१२ देवगड  पुरळ- संजय बोंबडी  BJP
१३ पडेल-सुयोगी रवींद्र घाडी BJP
१४ बापर्डे-अवनी अमोल तेली BJP
१५ पोंभुर्ले-अनुराधा महेश नारकर BJP
१६ शिरगाव- देवदत्त कदम  BJP
१७ किंजवडे-सावी गंगाराम लोके BJP
१८ कुणकेश्वर- सुनील पारकर  BJP
१९ मालवण  आडवली मालडी-सोनाली घाडीगावकर  शिवसेना (शिंदे)
२० आचरा-वर्षा सांबरी  शिवसेना (शिंदे)
२१ मसुरे मर्डे- क्षमा हडकर  BJP
२२ सुकळवाड- सुमेधा पाताडे  शिवसेना (शिंदे)
२३ पेंडूर- संतोष साटविलकर  शिवसेना (शिंदे)
२४ वायरी भूतनाथ- अक्षता गावडे  शिवसेना शिंदे पुरस्कृत 
२५ कुडाळ  आंब्रड- दीपलक्ष्मी पडते  शिवसेना (शिंदे)
२६ वेताळ बांबार्डे- नागेश नाईक शिवसेना (शिंदे)
२७ ओरोस बु.- सुप्रिया वालावलकर  BJP 
२८ पावशी- तुकाराम साईल  शिवसेना (शिंदे)
२९ नेरूर देऊळवाडा- रुपेश पावसकर  अपक्ष 
३० तेंडोली- आरती पाटील  BJP 
३१ पिंगुळी- गंगाराम सडवेलकर  UBT 
३२ घावनळे- दीपक नारकर  शिवसेना (शिंदे)
३३ माणगाव- रुपेश कानडे  शिवसेना (शिंदे)
३४ वेंगुर्ला  म्हापण-यज्ञा साळगावकर शिवसेना (शिंदे)
३५ आडेली- विजय नाईक  UBT 
३६ तुळस- सुजाता पडवळ  अपक्ष 
३७ उभादांडा- दत्ताराम गावडे  UBT 
३८ रेडी- प्रीतेश राऊळ  BJP
३९ सावंतवाडी माडखोल- शिवानी नाईक  अपक्ष 
४० आंबोली-शोभा गावडे  BJP
४१ कोलगाव-मायकल डिसोझा अपक्ष 
४२ तळवडे-संदीप गावडे  BJP
४३ माजगाव- विक्रम सावंत  BJP 
४४ इन्सुली- नितीन राऊळ  अपक्ष
४५ मळेवाड- अपर्णा सातोस्कर  BJP 
४६ आरोंदा- सुदन कवठणकर  शिवसेना (शिंदे)
४७ बांदा-प्रमोद कामत BJP 
४८ दोडामार्ग मणेरी- साक्षी तळवडेकर  शिवसेना (शिंदे)
४९ साटेली भेडशी- श्वेता धरणे  BJP 
५० माटणे- रामा गवस  BJP