सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक २०२६: प्रमुख मतदारसंघांतील ‘हाय-व्होल्टेज’ लढती

0
10

सिंधुदुर्गातील ५० मतदारसंघांपैकी खालील मतदारसंघांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथे बंडखोरी आणि मातब्बर उमेदवारांमुळे लढती चुरशीच्या झाल्या आहेत:

१. बंडखोरीमुळे गाजलेले मतदारसंघ

मतदारसंघ प्रमुख लढत (आमनेसामने) विशेष टिपणी
फोंडा सदानंद (बबन) हळदिवे (शिंदे सेना) Vs राजन चिके (अपक्ष) Vs अनंत पिळणकर (राष्ट्रवादी-शरद पवार) राजन चिके यांची भाजपमधून बंडखोरी; येथे तिहेरी लढत होत आहे.
हरकुळ बुद्रुक मनोज रावराणे (भाजप) Vs प्रमोद सांगवेकर (अपक्ष) सांगवेकर यांची शिंदे सेनेतून बंडखोरी.
नेरूर देऊळवाडा संजय पडते (शिंदे सेना) Vs रुपेश पावसकर (अपक्ष) पावसकर यांची भाजपमधून बंडखोरी; त्यांना ठाकरे सेनेचा पाठिंबा.
माटणे रामा गवस (भाजप) Vs राजेंद्र म्हापसेकर (अपक्ष) म्हापसेकर यांची भाजपमधून बंडखोरी.
मणेरी साक्षी तळवडेकर (महायुती) Vs सुनीता भिसे (अपक्ष) सुनीता भिसे यांची भाजपमधून बंडखोरी.
कोलगाव महेश सारंग (भाजप) Vs मायकल डिझोजा (अपक्ष) मायकल डिझोजा यांची भाजपमधून बंडखोरी; भाजप विरुद्ध भाजप सामना.

२. दोन सेना आणि भाजपमधील थेट लढती

मतदारसंघ प्रमुख उमेदवार राजकीय समीकरण
नाटळ संदेश सावंत (भाजप) Vs उत्तम लोके (ठाकरे सेना) पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत.
माणगाव रुपेश कानडे (शिंदे सेना) Vs रमाकांत ताम्हणेकर (ठाकरे सेना) दोन्ही शिवसेना गटांमधील प्रतिष्ठेची लढाई.
तळवडे संदीप गावडे (भाजप) Vs रुपेश राऊळ (ठाकरे सेना) महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा संघर्ष.
आडेली समिधा नाईक (अपक्ष – भाजप पुरस्कृत) Vs विजय नाईक (ठाकरे सेना) भाजप उमेदवाराचा अर्ज मागे; अपक्षाला दिलेले समर्थन निर्णायक ठरणार.