राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा

0
3

दिल्ली –  राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु असून आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. अजितदादांच्या मृत्यूबाबत समर्थकांचे आरोप सुरु आहेत. आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. या सार्‍या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा असतील, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत त्यांनी पूर्णतः मौन पाळले. प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा करताना आरोप प्रत्यारोपाकडे दुर्लक्ष करुन कामाला लागूया, पक्ष मजबूत करुया, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.