जेष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयाने दिला माहिती

0
3

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक आणि माजी केंद्रिय व संरक्षण मंत्री नामदार शरदचंद्र पवार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.

रुग्णालयाचे चेअरमन आणि मुख्य हदयरोग तज्ञ डॉ. पूरवेज ग्रँट यांनी दिलेल्या निवेदनानुसार शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. तत्काल व्यस्त दिनक्रम सुरु करण्याऐवजी नियोजनबध्द कामकाज सुरु करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. दरम्यान अधिक लोकांचा संपर्क आल्याने त्यांना छातीत संसर्ग झाला होता, त्यामुळे कफचे प्रमाण वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.