धक्कादायक: मुंबईतील १०० डॉक्टरांनी दिले २३७ बांग्लादेशींना जन्मदाखले

0
3

मुंबई – शहरात बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. महापौर रितू तावडे यांनी हा प्रश्‍न गांभिर्याने हाती घेतला आहे. याबाबत आज महापौर तावडे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील १०० डॉक्टरांनी २३७ बांग्लादेशींना जन्मदाखले दिले. महापौर तावडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यात विशेष म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या रुग्णालयांच्या नावावर हे दाखले  वाटप झाले आहेत. महापालिका प्रशासनाने या डॉक्टरांची यादी महापौरांना सादर केली आहे. येत्या तीस दिवसांत दाखले जप्त करुन देशद्रोहचा खटला दाखल करा, अशा सूचना महापौर तावडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.