होळीची कोकण रेल्वेने प्रवाशांना दिली मोठी भेट, ९४ होळी विशेष आणि ९२ अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या धावणार

0
5

मुंबई-मध्य रेल्वेवरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे ते नागपूर, हजरत निजामुद्दीन, दानापूर दरम्यान एकूण १८६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यात ९४ होळी विशेष आणि ९२ अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या १० फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०२१४१ द्वि-साप्ताहिक विशेष सीएसएमटी येथून २२ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत दर रविवार व मंगळवारी रात्री १२.२० वाजता सुटेल व नागपूर येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४२ नागपूर येथून २२ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत दर रविवार व मंगळवारी रात्री ८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे,कल्याण,नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा येथे थांबे देण्यात येतील.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०११७१ सीएसएमटी येथून २६ फेब्रुवारी ते ५ मार्च रोजी दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११७२ सावंतवाडी रोड येथून २६ फेब्रुवारी ते ५ मार्च रोजी दर गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ येथे थांबा असेल.

एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०१११९ एलटीटी येथून २६ फेब्रुवारी ते ५ मार्च रोजी दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११२० सावंतवाडी रोड येथून दर शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ येथे थांबा असेल.

सीएसएमटी-गोरखपूर-सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या ३२ फेऱ्या, एलटीटी-बनारस-एलटीटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या, एलटीटी-समस्तीपूर-एलटीटी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या, एलटीटी-दानापूर-एलटीटी दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या ३२ फेऱ्या, पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या धावतील. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या धावतील. पुणे-दानापूर-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या धावतील. पुणे-दानापूर-पुणे दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या ३२ फेऱ्या धावतील. पुणे-गाझीपूर शहर-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या धावतील. पुणे-गोरखपूर-पुणे दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या ३२ फेऱ्या धावतील. पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या चार फेऱ्या धावतील.