सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मार्गावर नाबरवाडी येथे आज सकाळी सुमारे ११.३० वाजता दुचाकी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार नीलम निलेश मेस्त्री (रा. नेरुर, ता. कुडाळ) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. कुडाळ ते मालवण मार्गावर भरधाव डंपर व ट्रकची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. संबंधित भरधाव वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी प्रशासनाला दिला आहे.
Home ताज्या घडामोडी कुडाळ-मालवण मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू, नागरिक आक्रमक

