रायगड हादरले, जावयाने सासूला या कारणासाठी संपवले

0
10

रायगड – रेवदंडा परिसरात खळबळ उडवणाऱ्या वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. या घटनेमागे नात्यातील विश्वासघात असल्याचे उघड झाले असून, मयत महिलेचा जावईच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मौजे टेकाळकर आळी, चोल (ता. अलिबाग) येथे एकट्या राहणाऱ्या मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) या २८ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. घरात जबरी प्रवेश करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तसेच सोन्याचे दागिने लुटल्याचे तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकांनी तांत्रिक व सायबर विश्लेषणाच्या आधारे तपास करत चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये महादेव ऊर्फ शिवा ढोबळे (वय २५) हा मयत महिलेचा जावई असून त्यानेच सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यात त्याला साथ देणारे आणखी तीन आरोपी अटकेत असून, चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यासह खुनाची पद्धत उघड करण्याचा पुढील तपास सुरू आहे.