म्हणून ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक; आमदार भास्कर जाधवांचा घणाघात!

0
5

चिपळूण: “विद्यमान सरकारला ना लोकशाहीवर विश्वास आहे, ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर!” अशा परखड शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भास्कर जाधव पुढे म्हणाले की, ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार दर पाच वर्षांनी निवडणुका होणे बंधनकारक असतानाही, या सरकारने लोकशाहीचा कोणताही मानसन्मान न राखता तब्बल ९ वर्षे निवडणुका टाळल्या. स्थानिक जनतेला त्यांचा हक्काचा प्रतिनिधी मिळवून देण्यापासून रोखण्यात आले, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. ३६ पैकी केवळ १२ जिल्ह्यांतच या निवडणुका घेतल्या जात असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली.

मतदारांना आवाहन करताना जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “कोणाच्याही दबावाखाली येऊ नका, दहशतीला बळी पडू नका. ” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.