अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ वाढले; युरोपीय एजन्सीमार्फत होणारी चौकशी ‘त्या’ बड्या नेत्याने रोखली? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

0
8

दादांचा मृतदेह ‘ॲबनॉर्मल’ फुगला होता! बारामती विमान अपघातात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचे दिल्लीतून खळबळजनक खुलासे

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला १५ दिवस उलटल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. “दादांचा तेरावा विधी झाल्यानंतर मी सविस्तर बोलेन,” असे आश्वासन देणारे त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी मुंबईत आणि त्यानंतर लगेचच आज देशाची राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी या अपघाताबाबत अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या असून, थेट ‘घातपाता’चा संशय व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक आरोप केला की, बारामती येथे झालेल्या या विमान अपघाताची चौकशी एका निष्पक्ष युरोपीयन एजन्सीमार्फत केली जाणार होती. मात्र, महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रभावशाली आणि ‘मोठ्या’ नेत्याने आपला राजकीय प्रभाव वापरून ही चौकशी रोखून धरली. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तो ‘बडा नेता’ नेमका कोण? यावर आता चर्चांना उधाण आले आहे. हा अपघात नसून कट असल्याचा दाट संशय रोहित पवारांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ सीआयडी किंवा डीजीसीएवर न सोपवता आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी संस्थांकडून करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

दादांचा मृतदेह ‘ॲबनॉर्मल’ पद्धतीने फुगलेला होता

या संशयाला बळकटी देण्यासाठी रोहित पवारांनी अजित पवारांच्या पार्थिवाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत जी बाब त्यांनी गोपनीय ठेवली होती, त्याचा खुलासा त्यांनी दिल्लीत केला. अपघातानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अजित पवारांचा मृतदेह काहीसा फुगलेला दिसत होता, ज्याकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही लक्ष वेधले होते. आता रोहित पवारांनी यावर डॉक्टरांचा संदर्भ देत मोठे विधान केले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांचा मृतदेह हा नैसर्गिकरित्या किंवा अपघातात होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजेच ‘ॲबनॉर्मल’ पद्धतीने फुगलेला होता.

विमान मालक आणि विमान कंपनीच्या कारभारावर आधीच संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवारांनी आता थेट वैद्यकीय अहवाल आणि चौकशीत अडथळा आणणाऱ्या नेत्यावर बोट ठेवल्याने अजित पवारांसोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं, याच गूढ आता अधिकच गडद झाले आहे.