लाडक्या बहिणींना महिन्याच्या १० तारखेला मिळणार योजनेचा लाभ

0
5

पुणे- लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाभ वितरित होईल, असा शासन निर्णय झाला आहे. सोबतच सरकारने ’ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे.

राज्यातील सव्वादोन कोटी पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा सरासरी ३२०० कोटी रुपये लागतात. मात्र, डिसेंबरपासून लाडक्या बहिणींसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या चार महिन्यांचे सहा हजार रुपये एप्रिलमध्ये एकदम मिळतील, असे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. अनेक लाभार्थींनी चुकीचे पर्याय निवडल्यामुळे पात्र महिलांचे पैसे अडकले होते. त्यांनी मुदतीत चूक दुरुस्ती करावी, असे महिला व बालविकास आयुक्त पुणे नयना गुंडे यांनी सांगितले आहे.